कणकवली प्रतिनिधी✍️ कणकवली तालुक्यातील एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदाराचा मृत्यू अनेक प्रश्न आणि आता तपासात समोर आलेला नवा धागा!
कणकवलीतील स्मिता माने ९ ऑक्टोबर रोजी घरातून बेपत्ता झाल्या… दोन दिवसांनी बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला!
आता कणकवली-बिडवाडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्मिता माने एसटी बसने एकट्याच प्रवास करताना दिसल्याची माहिती समोर आली आहे. बसच्या वाहकानेही त्यांच्या प्रवासाला दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात त्यांच्या बहिणीने पतीच्या जाचाबाबत आणि संभाव्य घातपाताबाबत संशय व्यक्त केला होता. पती सचिन माने यांना अटक झाली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
मात्र, स्मिता माने यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्या दिवशी काय घडलं? या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत.
पोलिसांनी आत्महत्येची शक्यता व्यक्त केली असली, तरी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
एका महिलेच्या मृत्यूमागचं सत्य समोर यावं… प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळावं… आणि तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, हीच अपेक्षा!
स्मिता माने मृत्यूप्रकरणातील सत्य समोर येईल का? तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधले आहेत.