जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

खानोलीत १४ नोव्हेंबरला भव्य तिरंगी डबलबारी भजनाचा सामना;मनीष दळवी मित्रमंडळाचे आयोजन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

खानोलीत १४ नोव्हेंबरला भव्य तिरंगी डबलबारी भजनाचा सामना;मनीष दळवी मित्रमंडळाचे आयोजन
“

श्री.सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी खानोली सोसायटीच्या भव्यदिव्य नूतन इमारतीचे उद्घाटन

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : खानोली येथील सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या भव्य नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त मनिष दळवी मित्रमंडळाच्या वतीने शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य तिरंगी डबलबारी भजनाच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री.सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या भव्य नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त राजकीय मान्यवर प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.


या तिरंगी डबलबारी सामन्यात नामवंत भजनबुवांचा सहभाग असणार आहे. यामध्ये बुवा संदिप लोके आणि विजय परब यांच्या नेतृत्वाखालील वडची देवी भजन मंडळ, लिंगडाळ (देवगड), बुवा विजय ऊर्फ गुंडू सावंत यांच्या नेतृत्वाखालील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे आणि बुवा संदिप पुजारे यांच्या नेतृत्वाखालील श्री महादेवेश्वर प्रासादिक भजनी मंडळ, नाडण यांच्यात भजनाचा रंगतदार सामना रंगणार आहे.




या भजन मंडळांना पखवाजावर योगेश सामंत, विराज बावकर आणि संकेत राऊळ, तर तबल्यावर संदेश सुतार, भावेश परब आणि कौस्तुभ घाडी यांची साथ लाभणार आहे.




भक्तिमय वातावरणात रंगणाऱ्या या तिरंगी डबलबारी भजनाच्या सामन्याचा लाभ भजनप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मनिष दळवी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!
सामाजिक

दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दोडामार्ग,सावंतवाडीत हत्ती हटाव मोहीम राबविली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू जिल्हा प्रमुख मा. आमदार वैभव नाईक
राजकीय

दोडामार्ग,सावंतवाडीत हत्ती हटाव मोहीम राबविली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू जिल्हा प्रमुख मा. आमदार वैभव नाईक

दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची दत्ता सामंत यांनी भेट घेऊन केले सांत्वन
राजकीय

दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची दत्ता सामंत यांनी भेट घेऊन केले सांत्वन

ANCHOR AD SLOT