जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

मुंबईत ३.०८ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; तिघांना अटक

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मुंबईत ३.०८ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; तिघांना अटक
“

घाटकोपर अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; नालासोपाऱ्यातून मुंबईत आणले होते ड्रग्ज

मुंबई प्रतिनिधी✍️: मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने बोरिवली पूर्व परिसरात ही कारवाई केली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.




२५ ऑक्टोबर २०२६ रोजी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नॅशनल पार्कसमोरील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपींकडून १ किलो २८ ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची बाजारातील अंदाजित किंमत ३ कोटी ८ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.




या कारवाईत २८, २८ आणि ३९ वर्षे वयाच्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात आरोपींनी अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने हे ड्रग्ज नालासोपारा येथून मुंबईत आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपींचा एका खून प्रकरणाशीही संबंध असल्याची माहिती समोर आली असून, त्या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत.




एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल




या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२८/२०२६, तर अमली पदार्थविरोधी कक्षात गुन्हा क्रमांक ९९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अमली पदार्थांचा स्रोत, पुरवठादार आणि वितरण साखळी शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.




वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई




मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (अमली पदार्थविरोधी कक्ष) पौर्णिमा चौगुले-शृंगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.




घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अभिजित अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील आणि संदीप रहाणे यांच्यासह पोलीस अंमलदार व वाहनचालकांच्या पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला.




मुंबईत अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त झाल्याने अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT