जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची दत्ता सामंत यांनी भेट घेऊन केले सांत्वन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची दत्ता सामंत यांनी भेट घेऊन केले सांत्वन
“

दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही

कुडाळ प्रतिनिधी ✍️: वर्दे येथील दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन दत्ता सामंत यांनी त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून संशयिताला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि समाजात योग्य संदेश जावा, यासाठी या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, सभापती मिलिंद नाईक, संजय पडते, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर, पंचायत समिती सदस्य नागेश आईर, पंचायत समिती सदस्या श्रावणी तेरसे, घनश्याम तेरसे, कीर्तिकुमार तेरसे, स्वरूप वाळके, काका कुडाळकर, विनायक राणे, सागर पालव, वर्देचे पोलीस पाटील तसेच कडावल-वर्दे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT