जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
“

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर; नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या प्रयत्नांना यश

कुडाळ प्रतिनिधी✍️ : कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील दत्तनगर येथे मोकाट गुरांसाठी कोंडवाडा उभारण्याकरिता १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.




कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने येथे नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा वावर वाढल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून वाहनचालक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांमुळे अपघातांचा धोका अधिक वाढत आहे.




या गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदन सादर करून कुडाळ शहरात मोकाट गुरांसाठी कोंडवाडा उभारण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार निलेश राणे यांनी दत्तनगर येथे कोंडवाडा उभारण्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.




या निधीमुळे मोकाट गुरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था निर्माण होणार असून शहरातील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि संभाव्य अपघातांचा धोका कमी करण्यास मदत होणार आहे. कोंडवाड्यासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी इस्माईल शेख यांची निवड
राजकीय

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी इस्माईल शेख यांची निवड

खानोलीत १४ नोव्हेंबरला भव्य तिरंगी डबलबारी भजनाचा सामना;मनीष दळवी मित्रमंडळाचे आयोजन
सामाजिक

खानोलीत १४ नोव्हेंबरला भव्य तिरंगी डबलबारी भजनाचा सामना;मनीष दळवी मित्रमंडळाचे आयोजन

दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!
सामाजिक

दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT