वेंगुर्ला प्रतिनिधी : उभादांडा मित्र मंडळ, रोझारी युथ ग्रुप आणि श्री. कार्मिस आल्मेडा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा २१ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता उभादांडा शाळा क्रमांक २ येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे.
‘रक्तदान हेच महानदान’ या भावनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होत असल्याने नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदानासाठी नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी संदेश मोघे – ९७६४७७०५०६, अॅलेक्स फर्नांडिस – ७२६३९२२९३७, महेंद्र मोचेमाडकर – ८३९००११४२८ आणि चेतन पेडणेकर – ९८२३९९०५५४ यांच्याशी संपर्क साधावा.