जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वेंगुर्ल्यातील समई नृत्य स्पर्धेत डिगसच्या कालिका ग्रुपची बाजी!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वेंगुर्ल्यातील समई नृत्य स्पर्धेत डिगसच्या कालिका ग्रुपची बाजी!
“

शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच भव्य स्पर्धेचे आयोजन; रांगोळी स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : पारंपरिक समई नृत्याच्या माध्यमातून संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी वेंगुर्ल्यातील रसिकांना मिळाली. शिवप्रेमी मित्र मंडळ, माणिक चौक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य समई नृत्य स्पर्धा २०२६ ला स्पर्धकांसह प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. वेंगुर्ला शहरात प्रथमच आयोजित या स्पर्धेत विविध समई नृत्य ग्रुपनी आपल्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत डिगस, कुडाळ येथील कालिका समई नृत्य ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.




स्पर्धेतील द्वितीय क्रमांक गवळदेव समई नृत्य ग्रुप, बोर्डवे-कणकवली यांनी पटकावला, तर तृतीय क्रमांक देवी सातेरी समई नृत्य ग्रुप, मठ-वेंगुर्ला यांनी मिळवला. उत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार संत लालाजी मठ, टाकयेवाडी-वेंगुर्ला यांना देण्यात आला. जि. प. शाळा, परबवाडा १ यांच्या विशेष समई नृत्य सादरीकरणानेही लक्ष वेधून घेतले.




समई नृत्य स्पर्धेचे परीक्षण हर्षु बागायतकर आणि मयुरी माडकर यांनी केले.




दरम्यान, मंडळाच्या वतीने आयोजित ऑनलाइन संस्कार भारती रांगोळी स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत मेघना राऊळ यांनी प्रथम, अपर्णिता वेंगुर्लेकर यांनी द्वितीय, तर तृणाली माळकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण श्रुती दाभोलकर यांनी केले.




या दोन्ही स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी स्वरेया फाउंडेशन, नगराध्यक्ष दिलीपजी गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेविका सुषमा खानोलकर, लीना म्हापणकर, काजल कुबल, मयुरी केरकर, भूषण आंगचेकर, आनंद रेडकर, प्रसाद गुरव, हर्षद रेडकर, स्वप्नील पालकर, बंड्या तुळसुळकर, दर्शन तानवडे, ज्ञानेश्वर रेडकर, किशोर पोतदार, भाऊ मालवणकर, अमर दाभोलकर, शैलेश परुळेकर, उदय मालवणकर, हेमंत गावडे, सुमन कामत, साक्षी चमणकर, वैभव फटजी तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




कार्यक्रमाला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आयोजकांनी सर्व स्पर्धक, कलाकार, परीक्षक, प्रायोजक, मान्यवर, कार्यकर्ते आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. विशेषतः माणिक चौकातील रहिवासी आणि शिवप्रेमी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा सांस्कृतिक सोहळा यशस्वी झाला.




या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष रोहित वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष नितिश कुडतरकर, खजिनदार प्रथमेश यंदे आणि कार्याध्यक्ष विनय गोगटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. भविष्यातही अशाच सांस्कृतिक उपक्रमांना नागरिकांचे प्रेम आणि सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

खानोलीत १४ नोव्हेंबरला भव्य तिरंगी डबलबारी भजनाचा सामना;मनीष दळवी मित्रमंडळाचे आयोजन
सामाजिक

खानोलीत १४ नोव्हेंबरला भव्य तिरंगी डबलबारी भजनाचा सामना;मनीष दळवी मित्रमंडळाचे आयोजन

दहा दिवसांत पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू
सामाजिक

दहा दिवसांत पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू

भुयारी गटार योजनेचा निधी आणण्यात वैभव नाईक यांचे योगदान; महेश कांदळगावकर यांच्यावर तपस्वी मयेकर यांचा पलटवार!
राजकीय

भुयारी गटार योजनेचा निधी आणण्यात वैभव नाईक यांचे योगदान; महेश कांदळगावकर यांच्यावर तपस्वी मयेकर यांचा पलटवार!

आयुर्वेद आणि योग हाच निरोगी जीवनाचा मार्ग : डॉ. प्रशांत ससाणे
आरोग्य

आयुर्वेद आणि योग हाच निरोगी जीवनाचा मार्ग : डॉ. प्रशांत ससाणे

ANCHOR AD SLOT