जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दहा दिवसांत पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दहा दिवसांत पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू
“

आमदार बाळा नर यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई प्रतिनिधी✍️जोगेश्वरी पूर्व विभागातील पाणीपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, संपूर्ण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी गटारमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नावर आता ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.या पार्श्वभूमीवर आज आमदार अनंत (बाळा) नर यांनी के/उत्तर विभाग कार्यालयात सहायक आयुक्त श्रीमती रुपाली कदम आणि उपजल अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पाणीपुरवठ्याच्या समस्येवर अधिकाऱ्यांना जाब विचारला. वारंवार बैठका घेऊनही नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळत नसेल, तर या बैठकांचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला.तसेच ज्या नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे किंवा ज्या ठिकाणी अनधिकृत पाणी जोडण्या व पाइपलाइन देण्यात आल्या आहेत त्या सर्वांची तातडीने तपासणी करून अनधिकृत जोडण्या बंद करण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली. अनधिकृत पाणी जोडण्यांमुळे नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.येत्या १० दिवसांत पाणीपुरवठ्याच्या समस्येवर ठोस तोडगा निघाला नाही, तर संपूर्ण जोगेश्वरीकरांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल जोगेश्वरीकरांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. नागरिकांच्या या मूलभूत हक्कासाठी शेवटपर्यंत लढा सुरूच राहील या बैठकीला नगरसेवक कैलासनाथ पाठक, नगरसेविका लोना रावत, शिवानी परब,मानसी जुवाटकर, विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत,विधानसभा समन्वयक रविंद्र साळवी उपविभाग प्रमुख जयवंत लाड उपविभाग समन्वयक महेश गवाणकर, संदीप कोठारकर शाखाप्रमुख अमर मालवणकर, प्रदीप गांधी, नंदकुमार ताम्हणकर, श्री नितीश म्हात्रे ,व इतर पदाधिकारी व नागरिक आदी उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT