जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
“

शैक्षणिक क्षेत्रातील प्रामाणिक कार्याची राज्यस्तरावर दखल

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: वेंगुर्ला तालुक्यातील निवती गावचे सुपुत्र आणि कोचरे शाळेचे उपक्रमशील शिक्षक विनोद मेतर यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ प्राप्त झाला आहे.त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रामाणिक परिश्रमांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.

शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा नसून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा शिल्पकार असतो.विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण करणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे,तसेच शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्यांची रुजवण करणे,ही शिक्षकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते.या विचारांना केंद्रस्थानी ठेवून विनोद मेतर हे सातत्याने शैक्षणिक कार्य करीत आहेत.

‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ हा केवळ सन्मान नसून त्यांनी शिक्षक म्हणून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची पोचपावती आहे.विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरण्याचे कार्य यापुढेही अविरत सुरू ठेवून अजून प्रगती करत रहावे.तसेच हा सन्मान आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रेम,सहकार्य आणि आशीर्वादांना समर्पित केले आहे. शिक्षक विनोद मेतर यांच्या या यशामुळे कोचरे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून,त्यांच्या या पुरस्काराबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षकाच्या निष्ठेचा,मेहनतीचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणभावाचा गौरव करणारा हा पुरस्कार निश्चितच इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.तसेच विनोद मेतर शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल निवती पंचक्रोशी बरोबरच मित्रपरिवार, नातेवाईक, आणि सर्वच स्तरातून शुभेच्छा त्यांना भरभरून मिळत असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT