विधानपरिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातील शिवसेना-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज अमरावती येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी मंत्री उदय सामंत यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे सरचिटणीस, उपनेते श्री. राहुलजी शेवाळे, आमदार बच्चू भाऊ कडू, अमरावती लोकसभा संपर्क प्रमुख, आमदार किशोर आप्पा पाटील शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजीत अडसूळ, उपनेत्या प्रीतीताई बंड, महिला संपर्क नेत्या ॲड. संजनाताई गवळी, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने उपस्थित होते. अमरावती विभागातील शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री. किरण सरनाईक यांना आशीर्वादरूपी मतदान करून पुन्हा एकदा विधानपरिषदेत पाठवावे, असे आवाहन शिक्षक मतदारांना केले.
शिवसेना-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक मतदार यांच्या एकजुटीच्या बळावर अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.शिक्षकांचा विश्वास, महायुतीची एकजूट आणि विजयाचा निर्धार व्यक्त केला.