जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
“

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मच्छीमार कुटुंबीयांशी साधला संवाद; समस्या जाणून घेत शासनाकडून मदतीचे आश्वासन

मुंबई प्रतिनिधी✍️ : राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा परिणाम शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावरही होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्याला भेट देत मच्छीमार कुटुंबीयांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.


या भेटीदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. शकुंतला तोंबरी आणि विजय तुका यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. मच्छीमारांच्या रोजच्या अडचणी, मासेमारी व्यवसायासमोरील आव्हाने तसेच सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे कुटुंबांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाची माहिती त्यांनी जाणून घेतली.


दिवाळीच्या आनंदात मच्छीमार कुटुंबीयांनाही सहभागी करून घेत मंत्री राणे यांनी त्यांच्यासोबत सणाचे क्षण घालवले. यावेळी कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे वाटपही करण्यात आले. मच्छीमार बांधवांच्या अडचणींची शासनाला जाणीव असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना करेल. शासन मच्छीमार समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती घेत मच्छीमार बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले.


सण-उत्सवांच्या काळात केवळ शुभेच्छा न देता मच्छीमार कुटुंबीयांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा हा उपक्रम ठरला. संकटाच्या काळात मच्छीमार बांधवांना शासनाची साथ मिळेल आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी या भेटीतून व्यक्त केला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे सरसावले!
सामाजिक

पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे सरसावले!

ANCHOR AD SLOT