जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वेंगुर्ल्यात दसऱ्याचा उत्साह; सोने लुटण्याची परंपरा आणि शिवलग्न सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वेंगुर्ल्यात दसऱ्याचा उत्साह; सोने लुटण्याची परंपरा आणि शिवलग्न सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
“

तळकोकणात आपट्याच्या पानांनाच सोने लुटणे असे मानले जाते

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️नवरात्र या उत्सवाची सांगता दसरा सणाने होते. दसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमीच्या या पवित्र दिवशी वेंगुर्ले मध्ये सोने लुटण्याची परंपरा आणि शिवलग्न सोहळा अत्यंत उत्साहात, खेळीमेळीच्या आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दसऱ्याच्या दिवशी रामेश्वर मंदिरात सोने लुटण्याची परंपरा ही अनादी काळापासून चालत आलेली आहे. या परंपरेचा आनंद आजही ग्रामस्थ आणि भाविक लुटत आहेत. रामेश्वर मंदिरा बाहेर लावण्यात आलेल्या आपट्याच्या झाडाचे पूजन तहसीलदारांच्या तसेच मानकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

या पूजनानंतर हजारो भाविकांनी या आपट्याच्या झाडाची पाने लुटली. तळकोकणात आपट्याच्या पानांनाच सोने लुटणे असे मानले जाते. ही पाने एकमेकांना देऊन भाविकांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत उत्सवाचा आनंद घेतला.

सोने लुटण्याच्या कार्यक्रमानंतर हजारो भाविक वेंगुर्ले येथील रवळनाथ मंदिरात आयोजित केलेल्या शिवलग्न सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले.

रवळनाथ आणि शक्ती यांचा विवाह सोहळा फार थाटामाटात दरवर्षी परंपरेनुसार साजरा करण्यात येतो. यावेळी श्रीदेवी पावणाई, श्रीदेव रवळनाथ तसेच श्री देव भूतनाथ या तरंग देवता या सोहळ्यामध्ये उपस्थित असतात. पुरोहितांकडून मंगलाष्टके म्हणून मंगलमय वातावरणात शिवलग्न सोहळा पार पडला.

गेली कित्येक वर्षांपासून तळ कोकणात सुरू असलेल्या या पारंपरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी यंदाही हजारो भाविकांनी रवळनाथ मंदिराच्या परिसरात गर्दी केली होती. 

अतिशय पावित्र्यपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!
सामाजिक

दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दोडामार्ग,सावंतवाडीत हत्ती हटाव मोहीम राबविली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू जिल्हा प्रमुख मा. आमदार वैभव नाईक
राजकीय

दोडामार्ग,सावंतवाडीत हत्ती हटाव मोहीम राबविली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू जिल्हा प्रमुख मा. आमदार वैभव नाईक

दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची दत्ता सामंत यांनी भेट घेऊन केले सांत्वन
राजकीय

दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची दत्ता सामंत यांनी भेट घेऊन केले सांत्वन

ANCHOR AD SLOT