जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पावशी-पिंगुळीतील सोनसाखळी चोरींचा छडा ; ४७ वर्षीय संशयिताला अटक

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पावशी-पिंगुळीतील सोनसाखळी चोरींचा छडा ; ४७ वर्षीय संशयिताला अटक
“

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ✍️: कुडाळ तालुक्यात पावशी आणि पिंगुळी येथे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटनांची उकल करण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पद्मनाभ रामचंद्र कशाळेकर (वय ४७, रा. एमआयडीसी, वरची कुंभारवाडी, कुडाळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १५ हजार ५०० रुपये रोख रक्कम, गुन्ह्यांत वापरल्याचा संशय असलेली सुमारे दीड लाख रुपये किमतीची टीव्हीएस अपाचे आर-१६० दुचाकी, हेल्मेट आणि पेन रिलीफ स्प्रे जप्त करण्यात आला आहे.

१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता पावशी-बेलनदीवाडी येथे अनिता अशोक अंधारी (वय ५०) या कुडाळला जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या होत्या. यावेळी एका अनोळखी इसमाने घावनळे मठाकडे जाणाऱ्या रस्त्याची विचारणा करत त्यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून पळ काढला. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापूर्वी ९ सप्टेंबर रोजी पिंगुळी-सराफदारवाडी येथे एका वृद्ध महिलेच्या घरी जाऊन दरवाजा उघडताच तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणीही कुडाळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी समांतर तपासाचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चोरट्याचे वर्णन, बोलीभाषा, वाहनाची माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.

या तपासातून संशयिताची ओळख पटवून त्याला कुडाळ एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने पावशी आणि पिंगुळी येथील दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंगुळी येथील गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार, अविनाश ओटवणेकर आणि अमर कांडर यांनी केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे अभिनंदन केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT