जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे कृषी विभागाचे निर्देश

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे कृषी विभागाचे निर्देश
“

बाधित शेतकरी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना

बारामती प्रतिनिधी✍️ : दौंड तालुक्यातील मौजे बोरीऐंदी, सहजपूर व ताम्हणवाडी येथे दुष्काळामुळे बाधित झालेल्या सोयाबीन व बाजरी पिकांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी क्षेत्रीय पाहणी केली. यावेळी त्यांनी पीक पंचनाम्यांच्या कामाचा आढावा घेतला आणि पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. दौंड तालुक्यात 'ट्रिगर १' लागू झाल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या एकाही बाधित शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना श्री. तांबे यांनी दिल्या. तसेच पाहणीदरम्यान बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.या क्षेत्रीय पाहणीमुळे पीक नुकसान पंचनाम्यांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार असून, सर्व बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद विहित प्रक्रियेनुसार पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.


यावेळी यवत मंडळ कृषी अधिकारी सतीश जगताप, उपकृषी अधिकारी संतोष मोरे, सहायक कृषी अधिकारी पंढरीनाथ कुतवळ, शैलेश मोरे, विनायक जगताप, सूरज बाबर यांच्यासह परिसरातील बाधित शेतकरी उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT