जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

संकष्टीच्या शुभमुहूर्तावर देवगड हापूसची पहिली पेटी मुंबई बाजारपेठेकडे रवाना

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

संकष्टीच्या शुभमुहूर्तावर देवगड हापूसची पहिली पेटी मुंबई बाजारपेठेकडे रवाना
“

पहिली पेटी मुंबईच्या बाजारपेठेत पाठविण्यात आल्याने बांदकर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण

देवगड प्रतिनिधी✍️: संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर देवगड हापूस आंब्याच्या यंदाच्या हंगामाची उत्साहात सुरुवात झाली आहे. देवगड तालुक्यातील गिर्ये-रामेश्वर येथील प्रगतशील बागायतदार श्री. निलेश वसंत बांदकर यांच्या बागेतील यंदाच्या मोसमातील पहिली हापूस आंब्याची पेटी मुंबई बाजारपेठेकडे रवाना करण्यात आली.


विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या आशीर्वादाने हापूसची पहिली पेटी मुंबईच्या बाजारपेठेत पाठविण्यात आल्याने बांदकर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निसर्गाची साथ, बागेतील योग्य नियोजन आणि बागायतदारांचे अथक परिश्रम यांच्या जोरावर यंदाच्या हंगामातील पहिला हापूस बाजारपेठेत दाखल होत आहे.


देवगड हापूसला देशभरात विशेष मागणी असून, त्याच्या दर्जेदार चवीमुळे ग्राहकांमध्ये या आंब्याला मोठी पसंती मिळते. हंगामाच्या सुरुवातीलाच मुंबई बाजारपेठेत देवगड हापूसची आवक सुरू झाल्याने आंबा बागायतदारांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.


या पहिल्या पेटीच्या रवाना होण्याबद्दल प्रगतशील बागायतदार निलेश वसंत बांदकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, यंदाचा हापूस हंगाम त्यांच्या बागेसाठी तसेच देवगडच्या आंबा बागायतदारांसाठी फलदायी ठरावा, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT