जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात उद्या दिव्यांग मेळावा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात उद्या दिव्यांग मेळावा
“

भाजपा दिव्यांग विकास आघाडीसह विविध संस्थांचा संयुक्त विद्यमाने पुढाकार

भाजपा युवा नेते तथा महाराष्ट्रातील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपा दिव्यांग विकास आघाडी, सिंधुदुर्ग, कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना विविध शासकीय योजना व सुविधांची माहिती मिळवून देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे, हा अशा उपक्रमांमागील महत्त्वाचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, त्यांना समाजात समान संधी मिळाव्यात आणि त्यांच्या अडचणींना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केलेला हा मेळावा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरणार आहे. वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू घटकांसोबत साजरा करण्याच्या भूमिकेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT