जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

गोकुळचे १२ संचालक बेपत्ता असल्याची डाव्या आघाडीची पोलिसांत तक्रार!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

गोकुळचे १२ संचालक बेपत्ता असल्याची डाव्या आघाडीची पोलिसांत तक्रार!
“

अध्यक्ष निवडीच्या सभेपासून संचालक गायब असल्याचा दावा; ५.५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर प्रतिनिधी✍️ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. अध्यक्ष निवडीची विशेष सभा खोळंबल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळचे १२ नवनिर्वाचित संचालक बेपत्ता असल्याची लेखी तक्रार डाव्या आघाडीने पोलीस प्रशासनाकडे दाखल केली आहे. या संचालकांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी उपस्थित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.




१२ संचालक नेमके कुठे आहेत?




यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले की, २९ ऑक्टोबर रोजी आयोजित गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या विशेष सभेपासून १२ संचालक बेपत्ता आहेत. यामध्ये राजेश नरसिंगराव पाटील, राहुल पी. एन. पाटील, रणजित के. पी. पाटील, रणजित दिलीपराव पाटील, अंबरिशसिंह संजय घाटगे, चेतन अरुण नरके, अजित शशिकांत नरके, अजित पांडुरंग पाटील, वीरेंद्र संजय मंडलिक, मदन बाबूराव देसाई, अमर पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांचा समावेश आहे.




लोकशाही प्रक्रिया जिवंत राहण्यासाठी आणि गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या सभेचा आवश्यक कोरम पूर्ण होण्यासाठी पोलिसांनी या १२ संचालकांचा तातडीने शोध घ्यावा व त्यांना बैठकीत हजर करावे, अशी मागणी कांबळे यांनी 'मिसिंग' तक्रारीद्वारे केली.




जनता दलाचे शिवाजीराव परुळकर यांनीही या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला. संबंधित संचालक सहलीला गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अध्यक्ष निवडीसारखी महत्त्वाची बैठक असताना त्यांना सहलीवर कोणी नेले, याचा शोध पोलीस यंत्रणेने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.




दिलीप पवार यांनीही या तक्रारीचा तपास तातडीने आणि जलदगतीने करण्याची मागणी केली. अन्यथा गोकुळशी संबंधित ५.५ लाख दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला.




दरम्यान, गोकुळमध्ये सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरची बदनामी होत असल्याची खंत डाव्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकाराच्या निषेधार्थ उद्या सर्वसामान्य नागरिकांचा व्यापक संघर्ष मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात कोल्हापुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.




डाव्या आघाडीने सादर केलेले निवेदन स्वीकारताना संबंधित अधिकारी कागलकर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस अधीक्षकांना माहिती देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.




यावेळी टी. एस. पाटील, वसंतराव पाटील, रवी जाधव, संजय साठे, विवेकानंद गोडसे, राजेश वरक, मधुकर पाटील यांच्यासह डाव्या आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT