जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

विद्यार्थ्यांना थकबाकीच्या नावाखाली परीक्षेपासून वंचित ठेवल्यास युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाणार जिल्हाप्रमुख योगेश मराठे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

विद्यार्थ्यांना थकबाकीच्या नावाखाली परीक्षेपासून वंचित ठेवल्यास युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाणार जिल्हाप्रमुख योगेश मराठे
“

युवासेना प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील

धुळे प्रतिनिधी✍️: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालेला असताना शाळा-कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचा छळ: थकबाकीच्या नावाखाली परीक्षेपासून वंचित ठेवल्यास युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असे‌ धुळे युवासेना जिल्हा प्रमुख योगेश मराठे यांनी प्रखर शब्दात सांगितले.राज्य सरकारने महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती जाहीर केलेली असताना आणि शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनता आधीच आर्थिक संकटात असताना, दुसरीकडे काही शाळा आणि महाविद्यालयांचे संचालक मात्र विद्यार्थ्यांकडून फी वसुलीसाठी अरेरावी करत असल्याचे समोर आले आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रथम सत्राच्या (1st Semester) परीक्षा सुरू होत आहेत. मात्र, केवळ फी बाकी आहे या कारणास्तव विद्यार्थ्यांना पावती (Receipt) किंवा हॉलतिकीट नाकारले जात आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू न देता शाळा-कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थी व पालकांना विनाकारण नाहक त्रास दिला जात असल्याच्या संतप्त तक्रारी युवासेनेकडे प्राप्त झाल्या आहेत.

दुष्काळातही वसुलीचा तगादा, शिक्षण संस्थांची मुजोरी!

एकीकडे दुष्काळाच्या सावटाने बळीराजाचे आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, मुलांचे शिक्षण कसे चालवायचे असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे; तर दुसरीकडे हे शाळा-कॉलेज वाले पैशासाठी थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. दुष्काळाच्या काळात पालकांना सहकार्य करण्याऐवजी, उलट परीक्षांच्या तोंडावर पावती अडवून मुलांना त्रास देणे हे अत्यंत चुकीचे आहे. युवासेना ही मुजोरी अजिबात खपवून घेणार नाही.

युवासेना स्टाईलने आसूड ओढणार!

ज्या शाळा किंवा महाविद्यालये फी थकबाकीचे कारण सांगून कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेला बसू देणार नाहीत किंवा त्याची पावती रोखून धरतील, त्यांना युवासेनेच्या वतीने हा अत्यंत तीव्र इशारा समजण्यात यावा. अशा अरेरावी करणाऱ्या शिक्षण संस्थांवर‌‌ धुळे युवासेना आपल्या स्टाईलने आसूड ओढल्याशिवाय आणि त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाही!

पालक व विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका!

कोणत्याही शाळा, कॉलेज किंवा संस्थेने जर तुम्हाला फीच्या कारणावरून परीक्षेत बसण्यापासून रोखले किंवा पावती देण्यास टाळाटाळ केली, तर विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी मुळीच घाबरून न जाता तात्काळ खालील क्रमांकावर युवासेनेशी संपर्क साधावा. युवासेना प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि अशा संस्थांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन धुळे युवासेना जिल्हा प्रमुख योगेश मराठे यांनी दिले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!
सामाजिक

दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दोडामार्ग,सावंतवाडीत हत्ती हटाव मोहीम राबविली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू जिल्हा प्रमुख मा. आमदार वैभव नाईक
राजकीय

दोडामार्ग,सावंतवाडीत हत्ती हटाव मोहीम राबविली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू जिल्हा प्रमुख मा. आमदार वैभव नाईक

दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची दत्ता सामंत यांनी भेट घेऊन केले सांत्वन
राजकीय

दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची दत्ता सामंत यांनी भेट घेऊन केले सांत्वन

ANCHOR AD SLOT