जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दामिनीला न्याय मिळेपर्यंत आणि जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसतर्फे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल सौ. साक्षी वंजारी

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दामिनीला न्याय मिळेपर्यंत आणि जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसतर्फे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल सौ. साक्षी वंजारी
“

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी घटना घडणे अत्यंत चिंताजनक

कुडाळ तालुक्यातील कडावल ते वर्दे मार्गावर दामिनी किरण पालव (वय २०) या तरुणीची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. शांतताप्रिय आणि महिलांसाठी सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी घटना घडणे अत्यंत चिंताजनक असून, आरोपीला कायदेशीर कारवाई करण्याची गरज सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी यांनी व्यक्त केली आहे.या प्रकरणी राज्याचे पालकमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास गतिमान करावा, यासाठी महिला काँग्रेसतर्फे पालकमंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात येणार असून सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार असल्याचे वंजारी यांनी सांगितले आहे..




सखोल व निष्पक्ष तपास: दामिनी पालव हत्या प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून दोषी आरोपींचा तात्काळ शोध घ्यावा.

परजिल्ह्यातील कामगारांची नोंदणी व पडताळणी: जिल्ह्यात रोजगारासाठी येणाऱ्या परजिल्ह्यातील कामगारांची कायदा व नियमांनुसार योग्य ती ओळख पडताळणी (Police Verification) आणि आस्थापनांमधील अधिकृत नोंदणी प्रशासनाने निश्चित करावी.रेल्वे स्थानके व वाहतूक केंद्रांवर सुरक्षा वाढवणे: कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर तसेच मुख्य वाहतूक केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे.महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता पथके व गस्त वाढवावी.

दामिनीला न्याय मिळेपर्यंत आणि जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तडीस जाईपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसतर्फे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे सौ. साक्षी वंजारी यांनी स्पष्ट केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT