जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दामिनी पालव खून प्रकरणातील संशयिताच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दामिनी पालव खून प्रकरणातील संशयिताच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ
“

कुडाळ न्यायालयाचा आदेश; सुरा, कपडे, मोबाईलसह दुचाकी जप्त

कुडाळ प्रतिनिधी ✍️: सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेत असलेल्या दामिनी किरण पालव खून प्रकरणातील संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला अधिक तपासासाठी कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.




साहिल धुरी याच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीकडून गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेला सुरा, कपडे, मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आल्याची माहिती असलेली हिरोहोंडा दुचाकी जप्त केली आहे, अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी न्यायालयात दिली.




या प्रकरणाच्या तपासात आणखी काही बाबींची चौकशी व तपास करणे आवश्यक असल्याने संशयित आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. न्यायालयाने पोलिसांची ही मागणी मान्य करत साहिल धुरी याला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.




दरम्यान, दामिनी पालव खून प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी कोणते धागेदोरे आणि खुलासे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT