जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दुग्ध संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाशी जोडावे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दुग्ध संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाशी जोडावे
“

जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट; जिल्हा बँकेकडून आर्थिक पाठबळ – मनीष दळवी

सिंधुदुर्गनगरी✍️: जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून त्यांना दुधाळ जनावरे खरेदीसाठी प्रोत्साहन द्यावे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.




सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात दुधाळ जनावरे खरेदी योजनेच्या संदर्भात दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दळवी बोलत होते.




गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी दुग्धव्यवसायासारखा शेतीपूरक व्यवसाय उभा करणे गरजेचे आहे, असे दळवी यांनी सांगितले. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने आपल्या गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना या व्यवसायाशी जोडून शेतकऱ्यांचा गट तयार करावा. अशा पद्धतीने प्रत्येक गावात गट निर्माण झाल्यास जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ जिल्हा बँकेकडून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.




लाभार्थी निवडीसाठी शासकीय यंत्रणांची मदत घेता आली असती; मात्र निवडलेले लाभार्थी प्रत्यक्ष दुग्धव्यवसायाशी जोडलेले असतीलच, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे दुग्ध संस्थांशी संबंधित तसेच दुग्धव्यवसायाचा अनुभव आणि आवड असलेल्या शेतकऱ्यांची निवड करणे आवश्यक आहे. यंदा तीव्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता जनावरांची योग्य निगा राखू शकणाऱ्या लाभार्थ्यांची निवड महत्त्वाची आहे. त्यामुळे योग्य लाभार्थी निवडण्यासाठी दुग्ध संस्थांचा अनुभव आणि सहभाग महत्त्वाचा ठरेल, असेही दळवी यांनी नमूद केले.




जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शासनाच्या सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी एका दूध उत्पादकाला किमान २० हजार रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहकार्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.




दूध संकलनात वाढ करणाऱ्या संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबत जिल्हा बँक सकारात्मक असून, यासंदर्भातील प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.




“बँकेचा उद्देश नफा मिळवणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे,” असे सांगत दुग्ध संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दळवी यांनी केले.




या कार्यक्रमास बँकेचे संचालक दिलीप रावराणे, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी आणि दुग्ध व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT