जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व खोट्या कागदपत्रांच्या आधारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व खोट्या कागदपत्रांच्या आधारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक
“

विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी उपोषणस्थळी भेट देत पीडितांना पाठिंबा दर्शविला

कणकवली प्रतिनिधी 🖊️: शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व खोट्या कागदपत्रांच्या आधारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पीडितांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी उपोषणस्थळी भेट देत पीडितांना पाठिंबा दर्शविला. पोलिसांच्या आश्वासनानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उपोषण स्थगित करण्यात आले.

या प्रकरणातील फिर्यादी सुनील दामोदर धुरे (रा. कलमठ, गावडेवाडी) यांच्या तक्रारीनुसार, शासकीय नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली. यातून १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. मुलांच्या भविष्याच्या आशेने पीडितांनी कष्टाने जमवलेली पुंजी दिली होती. फसवणूक उघड झाल्यानंतर अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.

या प्रकरणातील आरोपी विनीता विवेक मुंज आणि सुबत्ता गिरीश माळी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग-ओरोस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी फेटाळले. पुढील तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.तरीही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याचा आरोप पीडितांनी केला. यावेळी सुशांत नाईक यांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत पीडितांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली.

यावेळी तालुका प्रमुख राजू राठोड,रवी परब,सुनील धुरे, संतोष मस्के, प्रताप दळवी आणि मनीषा नाईक उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT