जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

शरीरसौष्ठव क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण उर्फ दादा बोवलेकर काळाच्या पडद्याआड

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

शरीरसौष्ठव क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण उर्फ दादा बोवलेकर काळाच्या पडद्याआड
“

दाभोली वेंगुर्ला तालुका सिंधुदुर्ग जिल्हा चे सुपुत्र

मुंबई प्रतिनिधी✍️: मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्रात अनेक नामवंत शरीरसौष्ठवपटू घडविणारे आणि व्यायाम संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण उर्फ दादा बोवलेकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शरीरसौष्ठव क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक आणि व्यायाम चळवळीचा एक महत्त्वाचा आधार हरपला आहे.




लक्ष्मण बोवलेकर हे दाभोली बोवलेकरवाडी तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग चे सुपुत्र होते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मुंबई येथे गेले.आणि एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून नावारूपाला आले. त्यांना दादा या नावाने ओळखले जात.शरीरसौष्ठव क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता एक सामाजिक आणि क्रीडा चळवळ म्हणून पाहिले. व्यायामाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच नव्या पिढीला शरीरसौष्ठवाची गोडी लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये त्यांनी ‘बोवलेकर हेल्थ सेंटर’ची स्थापना करून या क्षेत्रातील आपल्या कार्याची सुरुवात केली. पुढे मुलगा दिलीप आणि कुटुंबीयांच्या सहकार्याने मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये व्यायामशाळांचे जाळे विस्तारले.

मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्षपद तसेच अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी शरीरसौष्ठव खेळाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. व्यायाम संस्कृतीला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांची कारकीर्द घडविण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. कोरोनाच्या काळात त्यांच्या व्यायामशाळा व्यवसायालाही मोठा फटका बसला; मात्र शरीरसौष्ठव क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहणारे आहे.

मधुकर तळवलकर, विकी गोरक्ष, विजू पेणकर, भाई कदम आणि माधव पुजारी यांसारख्या शरीरसौष्ठव क्षेत्रातील दिग्गजांच्या मांदियाळीत लक्ष्मण बोवलेकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने शरीरसौष्ठव क्षेत्रातील एका समर्पित व्यक्तिमत्त्वाची उणीव निर्माण झाली आहे. त्यांनी उभारलेली व्यायाम चळवळ आणि घडविलेले खेळाडू यांच्या माध्यमातून त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत राहील.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!
प्रशासन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करून निधी खर्चाचे नियोजन करा!
प्रशासन

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करून निधी खर्चाचे नियोजन करा!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
सामाजिक

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

ANCHOR AD SLOT