कणकवली प्रतिनिधी✍️ : लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांना मनोरंजनाची अनोखी पर्वणी देण्यासाठी कणकवलीत ‘एक दिवस छोट्यांचा’ या संकल्पनेतून ‘किलबिल जल्लोष’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत गणपती साना, कणकवली येथे हा जल्लोष रंगणार आहे. समीर नलावडे मित्र मंडळ, कणकवली यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे मुंबई आणि पुण्यातील नामवंत गायकांचा संगीतमय नजराणा. विविध गाण्यांच्या सुरांनी उपस्थितांना संगीताची मेजवानी अनुभवता येणार आहे. लहान मुलांसाठी मनोरंजनाचे विविध उपक्रम आणि आकर्षक सेल्फी पॉईंटही उभारण्यात येणार असून, कुटुंबीयांसह या आनंदोत्सवाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
‘गाणे आणि खाणे’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विशेष खाऊ गल्ली सजणार आहे. यामध्ये पिझ्झा, पाणीपुरी, भेळपुरी, तंदूर, शोरमा, चिकन ६५, चायनीज पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक यांसह विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे संगीताचा आनंद घेत चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वादही उपस्थितांना घेता येणार आहे.
लहान मुलांसाठी खास आखण्यात आलेला हा उपक्रम पालक आणि कुटुंबीयांसाठीही आनंददायी ठरणार आहे. संगीत, मनोरंजन, खाद्यसंस्कृती आणि छायाचित्रांच्या आठवणी अशा विविध गोष्टींचा संगम असलेला ‘किलबिल जल्लोष’ कणकवलीकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.
तरी लहान मुलांसह पालकांनी आणि कणकवली परिसरातील नागरिकांनी रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून गणपती साना येथे उपस्थित राहून या ‘एक दिवस छोट्यांचा’ आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.