जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीसाठी सावंत कुटुंबाकडून दोन लाखांची देणगी

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीसाठी सावंत कुटुंबाकडून दोन लाखांची देणगी
“

कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक कार्याला आर्थिक हातभार; सावंत कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: येथील नरडवे इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान नाटळ जिल्हा परिषद सदस्य श्री. संदेश उर्फ गोटया सावंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना संदेश सावंत यांच्या कुटुंबीयांकडून दोन लाख रुपयांची देणगी देण्यात आली. कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ ही देणगी देण्यात आली असून, शालेय समितीचे चेअरमन यांच्याकडे देणगीची रक्कम सुपूर्द करण्यात आली.




शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी विविध स्तरांतून सहकार्य मिळत असताना सावंत कुटुंबाने दिलेल्या या आर्थिक मदतीमुळे शाळेच्या उभारणीला मोलाचे बळ मिळणार आहे. कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मृती जपत शैक्षणिक कार्यासाठी दिलेल्या या योगदानाचे शाळा प्रशासन, स्थानिक मंडळ तसेच ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले.




यावेळी माजी सभापती श्री. सुरेश ढवळ, नरडवेचे सरपंच श्री. गणपत सावंत, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष श्री. अवी गुरुजी, माजी सरपंच श्री. प्रभाकर ढवळ, स्थानिक मंडळाचे सर्वेसर्वा श्री. एकनाथ उर्फ भाई सावंत, श्री. बाळू सावंत, उपसरपंच श्री. विनोद बागवे, श्री. विलास सावंत, श्री. सुरेश घोणे, श्री. वसंत कदम यांच्यासह हायस्कूलचे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर; कणकवलीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
राजकीय

युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर; कणकवलीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान
प्रशासन

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

ANCHOR AD SLOT