जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान
“

गाय-म्हैस पालन, शेळीपालन, कुक्कुटपालनासह विविध पशुधन आधारित व्यवसायांना मिळणार प्रोत्साहन; योजनेचा लाभ घेण्याचे बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवक आणि पशुपालकांना पशुधन आधारित व्यवसायातून आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत विविध पशुपालन प्रकल्पांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.




या योजनेमध्ये संकरित गाय किंवा म्हैस खरेदी, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय तसेच अंडी उबवणी केंद्र आणि इन्क्युबेटर युनिट यांसारखे विविध प्रकल्प राबविता येणार आहेत. याशिवाय चारा विकास आणि स्मार्ट कॉलर, सेन्सर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांनाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे.




या योजनेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर २०२६ पासून ऑनलाइन पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.




योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना फार्मर आयडी आणि महा आयडीचा वापर करावा लागणार आहे. शासनाच्या धोरणानुसार अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, अनुदानाची रक्कम आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने दोन टप्प्यांत जमा केली जाणार आहे.




या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदानाची तरतूद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच शेतकरी, महिला बचत गट आणि बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.




सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी, महिला, युवक आणि पशुपालकांनी या योजनेची माहिती घेऊन ऑनलाइन अर्ज करावेत आणि उपलब्ध अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर; कणकवलीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
राजकीय

युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर; कणकवलीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीसाठी सावंत कुटुंबाकडून दोन लाखांची देणगी
सामाजिक

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीसाठी सावंत कुटुंबाकडून दोन लाखांची देणगी

ANCHOR AD SLOT