सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: पवित्र पोर्टलअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पदभरती २०२५ च्या रूपांतरित फेरीतील समुपदेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊन नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या पात्र उमेदवारांचे समुपदेशन मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी निर्धारित वेळेत समुपदेशनासाठी उपस्थित राहून आपली उपस्थिती नोंदविणे आवश्यक आहे.
निश्चित केलेल्या वेळेत समुपदेशनासाठी उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना या प्रक्रियेद्वारे शाळा मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच समुपदेशन प्रक्रियेदरम्यान प्रशासनाकडून एकदा शाळेचे वाटप झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल केला जाणार नाही, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षकभरती २०२५ च्या रूपांतरित फेरीतील सर्व पात्र उमेदवारांनी या सूचनेची गांभीर्याने दखल घेऊन दिलेल्या वेळेत समुपदेशनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.