जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सातार्ड्डा दशक्रोशी मर्यादित कथाकथन स्पर्धेचे आयोजन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सातार्ड्डा दशक्रोशी मर्यादित कथाकथन स्पर्धेचे आयोजन
“

विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम कथानकांची निवड करून स्पर्धेत सहभागी व्हावे

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : सातार्ड्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या वतीने गुरुवार,दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दशक्रोशी मर्यादित कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्ते यामेश्वर कवठणकर यांचे वडील कै.रघुनाथ यशवंत कवठणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

येथील सुप्रसिद्ध महापुरुष मंदिरात होणाऱ्या या स्पर्धेला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार आहे.स्पर्धा तीन गटांत घेण्यात येणार असून,बालगटात इयत्ता तिसरी ते चौथी,लहान गटात इयत्ता पाचवी ते सातवी आणि मोठ्या गटात इयत्ता आठवी ते दहावी या वर्गांतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,कथाकथन कौशल्याला वाव मिळावा तसेच त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे,हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम कथानकांची निवड करून स्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT