जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

संघटनात्मक बांधणीसाठी नियमित बैठका आणि प्रभावी जनसंपर्कावर भर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

संघटनात्मक बांधणीसाठी नियमित बैठका आणि प्रभावी जनसंपर्कावर भर
“

दोडामार्ग भाजप मंडळाच्या मासिक बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

दोडामार्ग प्रतिनिधी✍️: भारतीय जनता पार्टी दोडामार्ग मंडळाची मासिक बैठक रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग येथील सुशीला हॉलमध्ये पार पडली. या बैठकीला भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे विविध स्तरांवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




बैठकीत संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने कामकाज करावे, याबाबत अतुल काळसेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक मंडळ उपाध्यक्षाकडे एका पंचायत समिती गणाची जबाबदारी सोपविण्यात यावी. प्रत्येक मोर्चाच्या बैठका दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत आयोजित कराव्यात. संबंधित पंचायत समिती क्षेत्रात पदाधिकाऱ्यांनी नियमित दौरे करून कार्यकर्ते आणि नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.




संघटनात्मक कामकाजात सर्व पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक असल्याचे सांगताना, जबाबदारी स्वीकारून काम करण्यास इच्छुक नसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या नागरिकाला शासकीय कामकाजात अडचण आल्यास त्याला सरकारी कार्यालयाऐवजी प्रथम भाजप कार्यालयाची आठवण झाली पाहिजे, इतका तत्पर आणि प्रभावी जनसंपर्क पक्षाच्या माध्यमातून निर्माण व्हायला हवा. नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, तसेच संघटनेत संवाद सातत्याने सुरू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.




या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शक्तिकेंद्र प्रमुख, सरपंच आणि बूथ अध्यक्ष उपस्थित होते. भाजप दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष तथा महिला मोर्चा जिल्हा सोशल मीडिया संयोजक आकांक्षा शेटकर, उपाध्यक्षा संध्या प्रसादी, शहर महिला अध्यक्ष सविता नाईक, उपशहर महिला अध्यक्षा मोहिनी रेडकर, महिला मोर्चा अध्यक्षा दीक्षा ताई यांच्यासह रुक्मिणी नाईक, कल्पना बुडकुले, नेहा ठाकूर, हसीना शेख, सोनिया नाईक, श्वेता धरणे, संजना मावळणकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.




भाजप दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनीही बैठकीत सहभाग घेतला. संघटनात्मक कामकाजाचा आढावा आणि आगामी काळातील कार्यपद्धती यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT