नाशिक प्रतिनिधी✍️: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भेट देत त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या या धार्मिक भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील धार्मिक विधी आणि पूजेचे पौरोहित्य पुरोहित गिरीश जोशी यांनी केले. पूजा-अर्चेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंदिरात दर्शन घेतले.
दर्शनानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांना त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध तयारीच्या दृष्टीने राष्ट्रपतींच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे.