निवती प्रतिनिधी✍️ संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा` या मोहिमेला प्रतिसाद देत वेंगुर्ला तालुक्यातील निवती पोलीस ठाण्याने एक आदर्शवत सामाजिक उपक्रम राबविला आहे. तालुक्यातील भूत कोंड वाडी, खवणे येथे निवती पोलीस ठाणे प्रभारी भीमसेन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टाफ, होमगार्ड,खवणे ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत पोलीस पाटील खवणे, कृषी सहाय्यक तथा ग्रामस्थ यांनी एकत्र येत श्रमदानातून कच्चा बंधारा बांधला. यावेळी पोलिसांनी नेहमीचा दंडुका बाजूला ठेवून हातात फावडे, घमेले घेतले आणि ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे खवणे परिसरातील पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता येणार असून, निवती पोलीस ठाण्याच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
निवती पोलीस ठाण्याने एक आदर्शवत सामाजिक उपक्रम राबविला
व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा
फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
“
निवती येते कच्च्या बंधारा उभारला
दादा सारंग
लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.
संबंधित बातम्या
एक टिप्पणी द्या
संबंधित बातम्या
सामाजिक
पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे सरसावले!
सामाजिक
दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!
सामाजिक
गोकुळचे १२ संचालक बेपत्ता असल्याची डाव्या आघाडीची पोलिसांत तक्रार!
सामाजिक
विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!