जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

नरकासुर दहनातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश! शाळा आठवणीतील ग्रुपचा पुढाकार; जमीन विक्री टाळा, पाण्याचा काटकसरीने वापर करा!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

नरकासुर दहनातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश! शाळा आठवणीतील ग्रुपचा पुढाकार; जमीन विक्री टाळा, पाण्याचा काटकसरीने वापर करा!

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️परूळे : नरकासुर दहनाच्या पारंपरिक उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड देत शाळा आठवणीतील ग्रुप, परुळे यांच्या वतीने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. उत्सवाच्या माध्यमातून गावाच्या भवितव्याशी निगडित महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधत जमीन आणि पाणी वाचविण्याचा संदेश देण्यात आला.




नरकासुर दहनातून वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश देतानाच गावातील शेतजमिनींची अनावश्यक विक्री थांबविण्याचे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले. जमीन ही केवळ मालमत्ता नसून आपल्या पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवण्याचा अनमोल वारसा आहे. त्यामुळे जमिनीचे महत्त्व ओळखून तिची विक्री टाळावी आणि गावाचा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जतन करावा, असे आवाहन करण्यात आले.




त्याचबरोबर सध्या दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असल्याची जाणीव ग्रामस्थांना करून देण्यात आली. पाण्याचा वापर जपून करावा, अनावश्यक पाणी वाया घालवू नये तसेच जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.




केवळ पारंपरिक उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, उत्सवाच्या माध्यमातून गावाच्या भवितव्याबाबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न शाळा आठवणीतील ग्रुपने केला. 'जमीन वाचवा, पाणी जपून वापरा आणि गावाचा वारसा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवा' हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT