जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी तात्काळ राजीनामे दिले पाहिजेत रुपेश राऊळ

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी तात्काळ राजीनामे दिले पाहिजेत रुपेश राऊळ
“

लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता या प्रकारामुळे अकार्यक्षमता चव्हाट्यावर

सावंतवाडी येथील नगरपालिकेत झालेल्या पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारात केवळ संबंधित सभापतींचा राजीनामा घेऊन हा विषय संपणारा नाही, तर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षा श्रद्धा भोसले आणि उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनीही तात्काळ आपल्या पदांचे राजीनामे दिले पाहिजेत, अशी आक्रमक मागणी ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे तीव्र ताशेरे ओढले. सावंतवाडी नगरपालिकेसह परिसरातील विविध संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे पेव फुटले असून सध्याचे पालिका प्रशासन भ्रष्टाचारात पूर्णपणे रुतले आहे, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेत राऊळ म्हणाले की, या गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता या प्रकारामुळे अकार्यक्षमता चव्हाट्यावर आली आहे. स्वतःच्या कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार करायला लावायचा आणि नंतर तो पचवायला साथ द्यायची, असाच कारभार सध्या सुरू आहे. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना राऊळ यांनी थेट आव्हान दिले की, जर या मतदारसंघाचे पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि खासदार खरोखरच सक्षम असतील, तर त्यांनी संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून दाखवावी. या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख राजेश शेटकर, अशोक धुरी, आबा केरकर, गोकुळदास मोटे यांच्यासह ठाकरे सेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT