जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

मुंबई मेट्रो मार्गिका १२-अ ला मंजुरी; औद्योगिक व लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क होणार अधिक सक्षम

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मुंबई मेट्रो मार्गिका १२-अ ला मंजुरी; औद्योगिक व लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क होणार अधिक सक्षम
“

मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका; पुढील साडेतीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई प्रतिनिधी🙏: मानपाडा-काटई नाका ते तळोजा या महत्त्वपूर्ण मार्गाला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो मार्गिका १२-अच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प पुढील साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.




या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) अशी १८.४० किलोमीटर लांबीची ही संपूर्ण मेट्रो मार्गिका उन्नत स्वरूपाची असून, त्यावर १२ स्थानके प्रस्तावित आहेत. या प्रकल्पात ६.९३ किलोमीटर लांबीचा चारपदरी आणि ८.६९ किलोमीटर लांबीचा सहापदरी एकात्मिक उड्डाणपूल समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गिकेवर दररोज सुमारे ४ लाख ७४ हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.




मेट्रो मार्गिका १२-अमुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईदरम्यानची वाहतूक जोडणी अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक व लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढणार असून, या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.




विविध मेट्रो मार्गिकांशी जोडणी




काटई नाका येथे मेट्रो मार्गिका १२ आणि बुलेट ट्रेन जोडमार्गाशी, तर काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो मार्गिका १४ शी जोडणी प्रस्तावित आहे. तसेच अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ शी जोडणी करण्यात येणार आहे. सर्व मेट्रो स्थानकांवर फीडर बससेवाही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.




या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासाचा कालावधी ४० ते ५० टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय वाढल्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल. परिणामी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनातही घट होण्याची अपेक्षा आहे.




प्रवासाचा वेळ कमी करणे, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण घटविणे, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणारी सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.




एमएमआरडीएकडे प्रकल्पाची अंमलबजावणी




मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिका आणि एकात्मिक उड्डाणपुलाच्या अंमलबजावणीसाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही समितीने मान्यता दिली. तसेच प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील निश्चित शासकीय जमीन प्रकल्प विकास आणि निधी उभारणीसाठी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली.




दरम्यान, राज्यातील सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामांना गती देऊन ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT