जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे! – पालकमंत्री नितेश राणे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे! – पालकमंत्री नितेश राणे
“

‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ विषयावर विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मांडली भूमिका

कणकवली प्रतिनिधी✍️: देशाची अंतर्गत सुरक्षा, बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांचा प्रश्न, मतदार यादी शुद्धीकरणाची SIR प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांचे संरक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कणकवली तालुक्यातील जानवली येथील हॉटेल निलम कंट्री साईड येथे आयोजित ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या विषयावर ते बोलत होते.




यावेळी बोलताना मंत्री राणे यांनी बेकायदा घुसखोरीचा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. बनावट कागदपत्रांच्या आधारे देशात वास्तव्य करणे तसेच अशा व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्याचे प्रकार रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या SIR प्रक्रियेमुळे दुबार, चुकीच्या आणि अपात्र नोंदींची पडताळणी होण्यास मदत होईल. परिणामी पात्र भारतीय नागरिकांचा मतदानाचा अधिकार अधिक सुरक्षित राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.




पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. बेकायदा घुसखोरांच्या विरोधात ‘डिटेक्ट, डिलीट, डिपोर्ट’ ही भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.




लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकार बदलण्याचा अधिकार हा जनतेचा असल्याचे सांगतानाच लोकशाही संस्थांबाबत जाणीवपूर्वक अविश्वास निर्माण करून अराजकता पसरविण्याचे प्रयत्न चिंताजनक असल्याचे राणे म्हणाले. देशाच्या भवितव्याचा विचार करताना राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने प्रथम भारतीय नागरिक म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे. देशाची सुरक्षा आणि लोकशाहीचे संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यासाठी जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.




या कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजप सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुषमा प्रभूखानोलकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील बुद्धिजीवी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT