जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

खारेपाटण येथे बचतगट दीपावली महोत्सव उत्साहात

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

खारेपाटण येथे बचतगट दीपावली महोत्सव उत्साहात
“

आमदार निलेश राणे यांची उपस्थिती; महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक

खारेपाटण प्रतिनिधी✍️: महिला बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बचतगट दीपावली महोत्सव २०२६ चा उद्घाटन सोहळा उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी महोत्सवाला उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. तसेच महिला बचतगटांच्या विविध स्टॉलना भेट देत त्यांच्या उत्पादनांची पाहणी केली आणि महिलांच्या मेहनतीचे कौतुक केले.




यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या हातच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून गावाचा तसेच संपूर्ण जिल्ह्याचा विकास आणि भविष्य घडणार आहे.




महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल बोलताना शिवसेनेच्या समाजकारणाच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला. शिवसेनेचे ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे ब्रीद प्रत्यक्ष कृतीतून जोपासले जात असल्याचे यावेळी दिसून आले.




महोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या बचतगटांच्या स्टॉलवर दिवाळी फराळ, विविध प्रकारचे लाडू, आकर्षक पणत्या व दिवे, शोभेच्या वस्तू तसेच विविध हस्तकला व हातकामाच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या विविध उत्पादनांनी संपूर्ण परिसराला दिवाळीच्या उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते. महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि आनंद हा या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.




यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, तालुकाप्रमुख मंगेश गुरव, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल लोके, युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे, गुरुप्रसाद शिंदे, सुहास राऊत, मंगेश ब्रह्मदंडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




महिला बचतगटांच्या कष्टाला बाजारपेठ आणि ग्राहकांचा थेट प्रतिसाद मिळवून देणारा हा महोत्सव खारेपाटणच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरला. त्यामुळे यंदाची खारेपाटणची दिवाळी ही महिलांच्या मेहनतीला मिळालेल्या प्रोत्साहनाची आणि त्यांच्या आत्मविश्वासाची दिवाळी ठरली.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT