जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कणकवली तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविणार राजू राठोड

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कणकवली तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविणार  राजू राठोड
“

लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बैठक

कणकवली प्रतिनिधी✍️: लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत कणकवली तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, संघटनेचा विस्तार करणे, प्रत्येक गावात शाखा स्थापन करणे तसेच आगामी काळातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.




बैठकीदरम्यान तालुक्यातील विविध विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील संघटनेची सद्यस्थिती, स्थानिक पातळीवरील समस्या आणि येणाऱ्या अडचणी लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्यासमोर मांडल्या. संघटनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच आगामी काळातील संघटनात्मक नियोजनाबाबतही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.




कणकवली तालुक्यात संघटनेची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख राजू राठोड यांनी दिली. या अभियानांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा स्थापन करून संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




या बैठकीला तालुकाप्रमुख राजू राठोड यांच्यासह कणकवली तालुक्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT