जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कुडाळ-रत्नागिरीतील दुचाकी मेकॅनिक संघटना एकत्र

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कुडाळ-रत्नागिरीतील दुचाकी मेकॅनिक संघटना एकत्र
“

समस्यांवर एकत्रितपणे तोडगा काढण्याचा निर्धार

कुडाळ प्रतिनिधी ✍️: कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन आणि एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनची संयुक्त बैठक कुडाळ येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत दुचाकी मेकॅनिकांसमोरील विविध प्रश्न, भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.




या बैठकीस एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फैयाज खतीब, जिल्हा सचिव धनंजय कदम, जिल्हा संघटक पारस खानविलकर, पावस विभागाचे अध्यक्ष महेश पालकर आणि ज्येष्ठ पदाधिकारी जितेंद्र भुते उपस्थित होते. कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तेंडोलकर, उपाध्यक्ष संदेश गावकर, सचिव गुरुनाथ धुरी, सहसचिव शंकर सातार्डेकर, खजिनदार मोहित मेथर, सहखजिनदार सचिन परब, कुडाळ शहरप्रमुख दिवाकर मांजरेकर, उपशहरप्रमुख प्रकाश सातार्डेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्यही उपस्थित होते.




सचिव गुरुनाथ धुरी यांनी मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष फैयाज खतीब यांनी संघटनेची स्थापना करताना तसेच तिची उभारणी करताना आलेले अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले. कुडाळ तालुका असोसिएशनने जिल्हा संघटनेच्या विस्तारासाठी सक्रियपणे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कुडाळच्या संघटनेला कोणत्याही वेळी आवश्यकता भासल्यास एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.




बैठकीदरम्यान दुचाकी मेकॅनिकांना भविष्यात भेडसावू शकणाऱ्या विविध समस्या आणि त्यावर करता येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कुडाळ तालुका असोसिएशनच्या सदस्यांनीही आपल्या अडचणी व प्रश्न मांडले. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दोन्ही संघटनांनी समन्वयाने आणि एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.




संघटनेतील प्रत्येक मेकॅनिकाचे हित आणि त्याच्या समस्या सोडविणे हेच संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट राहील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच भविष्यातील महत्त्वाचे निर्णय परस्पर चर्चा करून आणि सर्वांच्या सहमतीने घेण्यावरही एकमत झाले.




याशिवाय आगामी काळात संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करणे, सदस्यांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि मेकॅनिकांच्या विविध समस्यांवर एकजुटीने काम करणे याबाबत पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय केला.




बैठकीच्या शेवटी कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे सहसचिव शंकर सातार्डेकर यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT