जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

जिल्ह्यात तीन तलाठी साझांची पुनर्रचना

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

जिल्ह्यात तीन तलाठी साझांची पुनर्रचना
“

आंबेरी गांधीनगर आणि आमवणे गावांचा संबंधित तलाठी साझांमध्ये समावेश

सिंधुदुर्ग प्रतिनिधी ✍️: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी साझांच्या पुनर्रचनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील आंबेरी, गांधीनगर आणि आमवणे या गावांचा संबंधित तलाठी साझांमध्ये समावेश करून साझांची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अंतिम अधिसूचना जारी केली आहे.या अधिसूचनेनुसार पुढील बदल करण्यात आले आहेत.

१. आंबेरी गावाचा वाडोस साझामध्ये समावेश : तुळसुली कर्याद नारूर तलाठी साझातील आंबेरी गावाचा वाडोस तलाठी साझामध्ये समावेश करण्यात आला आहे.

२. गांधीनगर गावाचा पाट साझामध्ये समावेश : हुमरमळा तलाठी साझातील गांधीनगर गावाचा पाट तलाठी साझामध्ये समावेश करण्यात आला आहे.

३. आमवणे गावाचा किर्लोस साझामध्ये समावेश : असरोंडी तलाठी साझातील आमवणे गावाचा किर्लोस तलाठी साझामध्ये समावेश करण्यात आला आहे.

राज्यात वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ लक्षात घेऊन शासनाने तलाठी साझांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वीच्या २३६ तलाठी साझांमध्ये ९९ नवीन साझांची निर्मिती करून एकूण ३३५ तलाठी साझे निर्माण करण्यात आले आहेत.

तलाठी साझांचे मुख्यालय आणि त्यास संलग्न गाव यांमधील अंतर, उपलब्ध दळणवळण व्यवस्था तसेच ग्रामस्थांची सोय विचारात घेऊन ही पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४ च्या पोटकलम (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी ही अंतिम अधिसूचना जारी केली आहे.

ही अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, तलाठी साझा आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT