जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

हुमरमळा (वालावल) येथे करमळीवाडीतील साकवाचे काम पूर्ण

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

हुमरमळा (वालावल) येथे करमळीवाडीतील साकवाचे काम पूर्ण
“

पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे व सरपंच अमृत देसाई यांच्या प्रयत्नांना यश

कुडाळ प्रतिनिधी✍️: हुमरमळा (वालावल) येथील करमळीवाडीमध्ये भाटकर घर ते कुलस्वामिनी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील साकवाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे विकासकाम पूर्णत्वास आले.




हुमरमळा गावातील कोणतेही विकासकाम प्रलंबित राहू नये, यासाठी सरपंच अमृत देसाई आणि पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील विविध छोटी-मोठी विकासकामे मार्गी लागत असल्याचे अर्चना बंगे यांनी सांगितले.




गावातील विकासकामांसाठी स्थानिक ग्रामस्थांकडून नेहमीच सहकार्य मिळत असल्याने विविध कामे पूर्ण करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असून, आगामी काळातही गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही बंगे यांनी दिली.




यावेळी माजी सरपंच सुरेश वालावलकर, रमा वालावलकर, गणेश वालावलकर, सुमन वालावलकर, किशोर वालावलकर, गणेश केसरकर, विजय वालावलकर, महेश वालावलकर, किशोर पेढणेकर, उदय खडपकर, अनु आकलेकर, दीपक वालावलकर, विष्णू वालावलकर, हेमंत कद्रेकर, योगेश कानडे, रुपेश तुळसकर आदी उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT