सावंतवाडी प्रतिनिधी✍️:महिलांना एसटी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत देण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात या सुविधेचा लाभ घेताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सावंतवाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी तालुका संघटक भारती कासार यांनी केला आहे. हाफ तिकीटच्या नावाखाली महिलांची फसवणूक कशासाठी? महिलांना खरोखरच सवलत दिली आहे की केवळ जाहिरातबाजी केली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी अर्ध्या तिकिटाची सुविधा जाहीर करून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्ष प्रवासादरम्यान या योजनेचा लाभ घेताना महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कार्ड काढून त्याचे रिचार्ज करूनही इंटरनेट चालत नाही, तिकीट मशीनमध्ये कार्ड स्वीकारले जात नाही. त्यामुळे महिलांना नाइलाजाने पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याचे कासार यांनी सांगितले.
आज स्वतःलाही अशाच प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागल्याचे सांगत, हा केवळ आपला वैयक्तिक प्रश्न नसून अनेक महिलांच्या तक्रारी समोर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सवलतीच्या नावाखाली महिलांना मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड का सहन करावा लागत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करून काही मागण्या ही कासार यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
या संपूर्ण प्रकाराबाबत आपण स्वतः बस डेपोत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, महिलांना सवलतीचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा जाब विचारणार असल्याचे भारती कासार यांनी सांगितले.
महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली अर्ध्या तिकिटाची सवलत ही केवळ घोषणेपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रवासात सहज आणि विनाअडथळा मिळाली पाहिजे. प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करून महिलांना त्यांच्या हक्काच्या सवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.