रत्नागिरी प्रतिनिधी✍️: पालकमंत्री उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध गावांतील कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थांशी सामंत यांनी संवाद साधला. या संवादातून गावपातळीवरील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी विविध गावांमधील स्थानिक परिस्थिती, सामाजिक व राजकीय समीकरणे, विविध गटांची सद्यस्थिती, स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. तसेच प्रत्येक गावातील एकूण वातावरण समजून घेत स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली.
आगामी ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता स्थानिक कार्यकर्त्यांशी समन्वय राखण्यावर भर देण्यात आला. कार्यकर्त्यांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच गावपातळीवरील संघटनात्मक तयारी अधिक मजबूत करण्याच्या सूचना यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आतापासूनच सक्रिय होऊन आपापल्या गावांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि आवश्यक पूर्वतयारीला सुरुवात करावी, असे आवाहनही करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने गावागावांतील कार्यकर्त्यांशी संपर्क आणि समन्वय वाढविण्यावर या संवादातून भर देण्यात आला.