जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

बांद्यात शोषखड्डे बांधकामाला प्रारंभ; सावंतवाडी तालुक्यात ६३०० शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

बांद्यात शोषखड्डे बांधकामाला प्रारंभ; सावंतवाडी तालुक्यात ६३०० शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट
“

स्वच्छता, आरोग्य व भूजल संवर्धनासोबत ग्रामीण रोजगारालाही मिळणार चालना; ८८ हजार मनुष्यदिवसांची निर्मिती अपेक्षित

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : ग्रामीण भागातील घरगुती सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून गावांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य टिकविण्यासह पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समिती सावंतवाडीच्या वतीने शोषखड्डे बांधकाम उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत या कामाचा शुभारंभ शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत बांदा येथे उत्साहात करण्यात आला. जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.




यावेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका नाईक यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




सांडपाणी व्यवस्थापनातून स्वच्छतेला प्राधान्य




ग्रामीण भागात घरगुती सांडपाणी उघड्यावर साचल्याने अस्वच्छता निर्माण होते. शोषखड्ड्यांच्या माध्यमातून हे पाणी जमिनीत मुरविल्यास परिसरात सांडपाण्याची डबकी तयार होणार नाहीत. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासह संभाव्य रोगराई आणि अस्वच्छतेवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे. याशिवाय जमिनीतील ओलावा टिकवून भूजल पुनर्भरणालाही हातभार लागणार आहे.




शोषखड्ड्यातून मुरणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून परसबागेत भाजीपाला, केळी तसेच इतर उपयुक्त झाडांची लागवड करता येऊ शकते. त्यामुळे घरगुती पोषणसुरक्षेला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही मदत होणार आहे.




६३०० शोषखड्ड्यांतून ८८ हजार मनुष्यदिवसांची निर्मिती




या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शोषखड्ड्यांच्या बांधकामाची कामे विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत केली जाणार आहेत. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापनासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सावंतवाडी तालुक्यात एकूण ६३०० शोषखड्डे खोदण्याचे नियोजन असून, या कामांतून ८८ हजार मनुष्यदिवस निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यातून मजुरांना सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांची मजुरी मिळणार आहे.




‘प्रत्येक घरात शोषखड्डा – स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी गावाचा ध्यास’ या संकल्पनेतून सावंतवाडी तालुक्यात सांडपाणी व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती प्रयत्नशील आहे. स्वच्छता, आरोग्य, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, पोषणसुरक्षा आणि रोजगारनिर्मिती या विविध उद्दिष्टांची सांगड घालणारा हा उपक्रम ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराच्या परिसरात शोषखड्डा उभारून त्याचा स्वीकार करावा आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी गाव निर्माण करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT