जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

बंद पडलेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तातडीने सुरू करा!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

बंद पडलेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तातडीने सुरू करा!
“

माजी आमदार वैभव नाईक यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी; मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

कुडाळ प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आपला दवाखाना येथे महालॅबच्या माध्यमातून सुरू असलेली प्रयोगशाळा तपासणी आणि रक्तनमुना संकलन सेवा बंद झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. संबंधित सेवा पुरविणाऱ्या एचएलएल कंपनीची गेल्या दोन वर्षांपासूनची देयके महायुती सरकारकडून थकीत असल्यामुळे ही सेवा बंद पडल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासण्या कराव्या लागत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.




या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली. तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत बंद पडलेली महालॅबची प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली.




शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधांचा लाभ जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांना होत होता. मात्र, सेवा बंद झाल्यामुळे रुग्णांना तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली.




दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महालॅबची सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची ग्वाही दिली.




यावेळी शिवसेना आडवली-मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, भगवान परब आदी उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT