जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

आधी राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या ४० एकर जागेत उद्योग सुरू करा; मगच २१ व्या शतकातील एमआयडीसीच्या बाता मारा!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आधी राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या ४० एकर जागेत उद्योग सुरू करा; मगच २१ व्या शतकातील एमआयडीसीच्या बाता मारा!
“

माजी आमदार वैभव नाईक यांचा आमदार निलेश राणेंवर निशाणा; एमआयडीसीतील ३० कोटींच्या रस्त्याच्या कामावरूनही उपस्थित केला सवाल

कुडाळ प्रतिनिधी✍️ : २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याची घोषणा करणाऱ्या आमदार निलेश राणे यांनी आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांनी घेतलेल्या सुमारे ४० एकर जागेवर उद्योग सुरू करून दाखवावेत. त्यानंतरच नव्या एमआयडीसीच्या विकासाच्या बाता माराव्यात, असा जोरदार टोला कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. तसेच एमआयडीसीतील ३० कोटींच्या रस्त्याच्या कामात निलेश राणे यांचे कमिशन किती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.




आमदार निलेश राणे यांनी नुकतेच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, राज्यसभा खासदार तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविली. मात्र, एवढ्या मोठ्या संधी मिळूनही मागील ३६ वर्षांत कुडाळ एमआयडीसी किंवा जिल्ह्यातील अन्य एमआयडीसीमध्ये अपेक्षित उद्योग आणण्यात त्यांना यश आले नाही. आता कुडाळ एमआयडीसीच्या विकासाबाबत बोलणे म्हणजे त्यांच्या आधीच्या कारभारातील अपयशावरच शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे.




याउलट, निलेश राणे खासदार असताना आणि नारायण राणे उद्योगमंत्री असताना राणे कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये सुमारे ४० एकर जागा घेतली. मात्र, या जागांवर आजपर्यंत रोजगारनिर्मिती करणारे उद्योग सुरू झालेले नाहीत. त्यामुळे नव्या घोषणा करण्यापूर्वी या जागांवर प्रत्यक्ष उद्योग सुरू करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आव्हान नाईक यांनी दिले.




माझ्या कार्यकाळात प्रत्यक्ष उद्योग सुरू केले!




आपल्या आमदारकीच्या काळातील कामांचा उल्लेख करताना नाईक म्हणाले की, आपण केवळ घोषणा न करता कुडाळ एमआयडीसीमध्ये विविध उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून बजाज राईस मिल, गोदरेज कंपनी, दोन काजू प्रक्रिया उद्योग, काथ्या उद्योग, दोन वॉटर बॉटल कंपन्या तसेच ग्रँफिशर नेट्स या मत्स्यजाळी निर्मिती करणाऱ्या कंपनीसह विविध उद्योग सुरू झाले. उद्योजकांना एमआयडीसीमध्ये जागा आणि आवश्यक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. या उद्योगांमुळे आजही अनेक स्थानिक युवक आणि नागरिकांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.




राजकीय हस्तक्षेपामुळे उद्योजकांना अडचणी




गेल्या साडेतीन वर्षांत महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एमआयडीसीमधील राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांना जागा आणि आवश्यक सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी नवीन स्थानिक उद्योजक एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यास पुढे येत नाहीत. मात्र, निलेश राणे आमदार झाल्यापासून परप्रांतीय व्यक्तींना व्यावसायिक जागा तातडीने उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा आरोपही नाईक यांनी केला.




आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक कामे केली; मात्र त्याची कधीही जाहिरातबाजी केली नाही. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे ही आमदार म्हणून आपली जबाबदारी होती. असे असताना आपण दहा वर्षांत काहीच केले नाही, असे वारंवार सांगून निलेश राणे जनतेमध्ये आपल्याबाबत चुकीचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आपण किती कामे केली आणि जनतेसाठी किती वेळ उपलब्ध होतो, हे मतदारसंघातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT