जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

आजपासून भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजपासून भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह
“

लाचखोरीविरोधात निर्भयपणे पुढे या; तक्रार करण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी सजग राहून भ्रष्टाचाराच्या घटनांविरोधात निर्भयपणे आवाज उठवावा, तसेच लाच देऊ नये आणि लाच स्वीकारू नये, असे आवाहन सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, यंदाची या सप्ताहाची संकल्पना ‘सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे’ अशी आहे.




पोलीस उपअधीक्षक संगिता पाटील, पोलीस निरीक्षक विद्या जाधव आणि पोलीस निरीक्षक दीपक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय काम करून देण्यासाठी कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने संबंधित विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.




भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा




भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केवळ शासनाच्या यंत्रणेवर अवलंबून न राहता नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूल्यांचा स्वीकार करून भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असा संदेश या जनजागृती सप्ताहातून देण्यात येत आहे.




‘लाच देऊ नका, लाच घेऊ नका आणि भ्रष्टाचाराला मूक संमतीही देऊ नका,’ असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.




लाच मागितल्यास येथे करा तक्रार




लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा :




- टोल फ्री क्रमांक : १०६४

- कार्यालयीन व्हॉट्सॲप : ९९२२८९१०६४

- कार्यालयीन दूरध्वनी : ०२३६२-२२२२८९




भ्रष्टाचारमुक्त समाजाची निर्मिती ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात जागरूक राहून प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासनासाठी जनजागृती सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT