वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : युनियन बँकेचे वेंगुर्ला येथील सेवानिवृत्त कर्मचारी अविनाश पराडकर (वय ८८) यांचे गोवा येथील म्हापसा येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दोन नातू, जावई व सून असा परिवार आहे. ताज समूहाचे अधिकारी प्रशांत पराडकर आणि रेडी ग्रामपंचायतीच्या सदस्या रश्मी रेडकर यांचे ते वडील होत.
पराडकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत परिसरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.