जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कुडाळात नर्मदाआई संस्थेचा दिवाळी खरेदी महोत्सव सुरू

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कुडाळात नर्मदाआई संस्थेचा दिवाळी खरेदी महोत्सव सुरू
“

३६ स्टॉल्सवर विविध वस्तूंची रेलचेल; महिला व्यावसायिकांना मुंबईत व्यवसाय विस्ताराची संधी

कुडाळ प्रतिनिधी✍️: नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळच्या वतीने संस्थापक अध्यक्षा संध्या प्रसाद तेरसे यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘आम्ही आत्मनिर्भर’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये सुरू आहे. प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तूंचे तब्बल ३६ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

नर्मदाआई संस्थेच्या या विक्री प्रदर्शनाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. दरम्यान, सिंधुदुर्गसह कोकणातील महिला व्यावसायिक व उद्योजकांना आता मुंबई-डोंबिवली येथेही आपल्या उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात डोंबिवली येथे आयोजित होणाऱ्या खरेदी महोत्सवात महिला उद्योजक सहभागी होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्षा संध्या तेरसे यांनी दिली.

कोरोना काळात व्यापार-व्यवसाय ठप्प झाल्यानंतर महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून विक्री प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली. वर्षातून दोन ते तीन वेळा ग्राहकांसाठी ही प्रदर्शने आयोजित केली जातात. गणेशोत्सव, मकरसंक्रांत, दिवाळी तसेच मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात आयोजित होणाऱ्या या प्रदर्शनांमुळे महिला व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत आहे.

यंदाच्या दिवाळी खरेदी महोत्सवाचे आयोजन संध्या तेरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महालक्ष्मी हॉलमध्ये केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन संध्या तेरसे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव दीप्ती मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांच्यासह विविध स्टॉलधारक महिला उपस्थित होत्या.

दरम्यान, यंदाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘स्टेट्स स्पर्धे’चेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक व्ह्यूज मिळविणाऱ्या सहभागींसाठी तीन पैठण्यांसह उत्तेजनार्थ दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती संध्या तेरसे यांनी दिली.

तसेच ४, ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे होणाऱ्या खरेदी महोत्सवात नर्मदाआई संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील महिला उद्योजक व व्यावसायिकांना सहभागी होऊन आपला व्यवसाय मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला व्यावसायिकांना आता केवळ सिंधुदुर्गापुरते मर्यादित न राहता मुंबई परिसरातही आपल्या व्यवसायाचा विस्तार करता येणार आहे.

रविवार, २५ ऑक्टोबर रोजी या प्रदर्शन व खरेदी महोत्सवाची सांगता होणार आहे. जिल्ह्यातील ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाला भेट द्यावी तसेच स्टेट्स स्पर्धेत सहभागी होऊन पैठणी जिंकण्याची संधी साधावी, असे आवाहन नर्मदाआई संस्थेच्या वतीने संध्या तेरसे यांनी केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

वेंगुर्ल्यात भव्य नरकासूर स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ!
सामाजिक

वेंगुर्ल्यात भव्य नरकासूर स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ!

युवा पिढीने सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हावे :  प्राजक्ता बांदेकर शिरवलकर
सामाजिक

युवा पिढीने सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हावे : प्राजक्ता बांदेकर शिरवलकर

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

ANCHOR AD SLOT