जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वनविभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करू संजय गावडे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वनविभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करू  संजय गावडे
“

उभादांडा सुखटणवाडी भागात बिबट्याची दहशत

वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा सुखटणवाडी भागात बिबट्याची दहशत प्रचंड वाढली आहे. दिवसाढवळ्या हा बिबट्या मनुष्यवस्तीत घुसत असून, गुरे, आणि पाळीव कुत्र्यांवर हल्ला करत असल्याने संपूर्ण वाडीत भीतीचे वातावरण पसरले आहे.उद्या शेतात बागेत काम करणाऱ्या महिला, पुरुषांनवर हल्ला होऊ शकतो. आशिभीतीही संजय गावडे एसनी वेक्त केली.

दोन दिवसांपूर्वीच गायीवर हल्ला 

सुखटणवाडीतील रानात चरत असलेल्या एका गायीवर बिबट्याने हल्ला करून तिचा जागीच प्राण घेतला. यापूर्वीही या भागात आणि पाळीव कुत्र्यांना फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या ८ दिवसांपासून सुखटणवाडीतील ८ ते १० कुटुंबे दहशतीखाली असून, सायंकाळी ६ नंतर घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. लहान मुले आणि महिलांमध्ये जास्त भीती आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य तथा वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे यांना ग्रामपंचायत सदस्य, ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख श्री. देवा जुवलेकर यांनी माहिती दिल्या नंतर त्याठिकाणी वन विभागाचें कर्मचारी पाठवून पंचनामा केला, परंतु वाघाचा बंदोबस्त करण्यास वन विभाग निष्क्रिय ठरला आहे. त्यामुळे आंदोलन तालुक्यातच उभारावं लागेल, कारण संपूर्ण जिल्ह्यात तालुक्यात वन्य प्राण्यांनी हैदोस घातला आहे शासनही याकडे दुर्लक्ष करत असून शासना कडून या सरकार कडून कोणतेही उपाय अद्याप पर्यंत करण्यासाठी उपाय योजना आखल्या जात नसून, वेळ पडल्यास शेतकऱ्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी शेती, गुर ढोर,बकऱ्या यांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वसरक्षणाठी दिलेल्या बंदूका बाहेर एकाच वेळी तालुक्यात हातात घ्यावा लागतील त्याशिवाय आश्वासांच्या खैरती राज्यकर्त्यांच्या बंद होणार नाहीत.

गावडे म्हणाले, "हा बिबट्या आता रानात नाही तर थेट फार वस्तीत घुसला आहे. उद्या एखाद्या लहान मुलावर किंवा महिलेवर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण? वनविभागाने केवळ पंचनामा करण्यापुरते येऊ नये."

त्यांनी वनविभागाकडे ठाम मागण्या केल्या आहेत -

उभादांडा सुखटणवाडीत तात्काळ पिंजरा लावण्यात यावा.त्या भागात ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. वनरक्षकांची दिवस-रात्र गस्त वाढवावी.ज्या शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाला आहे, त्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.

"वनविभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा. जर येत्या २ दिवसात पिंजरा लावून कारवाई केली नाही, तर सुखटणवाडीतील सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही वनविभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करू," असा आक्रमक इशारा संजय गावडे यांनी दिला आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT