मुंबई प्रतिनिधी ✍️: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला असून, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा एकही रुपया न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाऊ नये, असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ विद्यार्थ्यांना सुरळीतपणे मिळावा, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
या प्रक्रियेचा विभागाकडून सातत्याने आढावा घेतला जात असून, पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळत आहे की नाही, याचीही पडताळणी केली जात आहे. ‘झिरो चलन’ सुविधेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना शुल्क भरण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
अडचण असल्यास विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन
परीक्षा शुल्कमाफीच्या प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण येत असल्यास संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक किंवा विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे.
विद्यापीठनिहाय संपर्क अधिकारी :
- मुंबई विद्यापीठ, मुंबई : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९), जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड (९८३३९६९९७७).
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. सविता कुलकर्णी (७७२००३६७७४), अजय ठुबे (७५८८१६९१३४).
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९), विद्यार्थी विकास संचालक अलोक जत्राटकर (८६९८९२८०८०).
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अंधारे (९९७५०५५१५५), विद्यार्थी विकास संचालक डॉ. काळवणे (७०२०६३४५०२).
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. हुशारसिंग साबळे (९९२३४०९४९१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. चिखलीकर (८३९०६६६७७७).
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. बाबासाहेब डोळे (८२३७००६५७२), विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभोरे (९४२३७०५०८१).
- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. योगेश पाटील (९४२३१८५०७३), विद्यार्थी विकास संचालक महाले (९८२३१९२८३१).
- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. नितीन कोळी (९८५००४२३५७), विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर (८८५५०८३९६४).
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अनुप पळसोकर (८३७८९७४२४०), विद्यार्थी विकास संचालक डॉ. विजय तांगडे (९५४५११२५५५).
- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. नवीन मंगुळे (९५११९१०५७५), विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रिया गेडाम (९०४९४७४११९).
- एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक संजय नेरकर (९९२२४४४४६७), विद्यार्थी विकास संचालक डॉ. अंकुश चव्हाण (९६८९६७२५०९).
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक : परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भटूप्रसाद पाटील (७७९८९२५४८५), विद्यार्थी विकास संचालक महेंद्र बनसोडे (९७६६०५९०७६).
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी परीक्षा शुल्कमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असून, पात्र विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.